अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

0

अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

उस्मानाबाद,दि.26():- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्‍यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे या योजनेंतर्गत इयत्ता पहिली मध्ये मोफत प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. इयत्ता पहिली करिता विद्यार्थ्याचे वय दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत 6 वर्षे पूर्ण असावे. अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, जन्मतारखेसाठी ग्रामसेवकाचा दाखला अथवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या व पालकाच्या आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत. विद्यार्थ्याच्या पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास पाल्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चीती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकांच्या किंवा पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.

अनु.जमातीच्या पालकांनी इयत्ता पहिलीच्या प्रवेशाकरिता आपल्या पाल्यांचे अर्ज दि.30 जून 2023 पर्यंत या कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत. तसेच अधिक माहितीसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी.आंधळे (मो.नं. 8369688911) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये असणाऱ्या व सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनु.जमातीच्या इच्छुक जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्यालयास दि. 30 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सोलापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top