वेद शैक्षणिक संकुलात सामाजिक न्याय दिन साजरा
कळंब - शहरातील ढोकी रोडवरील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. २६ जून २०२३ रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्त भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व कर्मचारी विनोद कसबे यांच्या हस्ते नारळ फोडून अभिवादन करून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने व प्रा.श्रीकांत पवार यांनी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक अविनाश म्हैत्रे,निदेशक सागर पालके,निदेशक विनोद जाधव,आदित्य गायकवाड यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.