धाराशिव :- माजी पंतप्रधान भारतरत्न डॉ.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त शहरातील प्रभाग क्र.05 काकडे प्लॉट येथे भारतीय जनता पार्टी चे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने काकडे प्लॉट येथील ओपन स्पेस मध्ये आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सहकार्याने रुपये 10 लक्ष निधीचा वॉकिंग ट्रॅक तसेच लहान मुलांची खेळणी या कामांचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी धाराशिव लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, प्र.का.सदस्य युवराज नळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, नगरसेवक श्री.अभिजित काकडे, दाजीआप्पा पवार तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.