शिंगोली आश्रम शाळेत शिवछत्रपतींची जयंती उत्साहात साजरी
धाराशिव : शिंगोली आश्रम शाळेत जाणता राजा शिवछत्रपतींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव व प्रमुख पाहुणे विशाल राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली व मुख्याध्यापक खंडू पडवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मुख्याध्यापक खंडू पडवळ यांनी स्वराज्य या संकल्पनेबद्दल माहिती दिली. रत्नाकर पाटील यांनी महाराजांच्या गुणांचे वर्णन करून विद्यार्थ्यांनी गुण आत्मसात करण्यास सांगितले. विशाल राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा कशे होते हे सांगितले. सतीश कुंभार यांनी महाराजांनी मोघलांना कसा सामना केला हे सांगितले . श्रद्धा सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देश कार्य करण्यासाठी आव्हान केले. कार्यक्रमासाठी सुरेखा कांबळे, साने मॅडम, वैशाली शितोळे, सचिन राठोड, कैलाश शानिमे, दीपक खबोले इत्यादी शिक्षक व कर्मचारी सागर सूर्यवंशी, सचिन माळी, मस्के भिकाजी, अमोल जगताप व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वैशाली शितोळे मॅडम यांनी मानले.