मुख्यमंत्री अभियान अंतर्गत , शिंगोली येथे माझी शाळा सुंदर शाळा तपासणी संपन्न

0

धाराशिव : 
मुख्यमंत्री अभियान अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा या तपासणीच्या वेळेस दत्तप्रसाद जंगम व भारत देवगुडे शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांनी शिंगोली आश्रम शाळेस भेट दिल्यानंतर ई लर्निंग रूमची पाहणी करून तेथे सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले, त्यावेळेस मुख्याध्यापक खंडू रंगनाथ पडवळ साहेबांनी व पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी त्यांचा शाल व फेटा बांधून सत्कार केला.

 या कार्यक्रमासाठी शिक्षक पाटील नागनाथ, पाटील रत्नाकर, जाधव चंद्रकांत, दीपक खबोले, शानिमे कैलास, अमदापुरे मदन कुमार, प्रशांत राठोड, सचिन राठोड, विशाल राठोड, सुधीर कांबळे, मल्लिनाथ कोणदे, सतीश कुंभार व ज्योती राठोड, ज्योती साने, शिक्षीका बालिका बोयने व कर्मचारी गोविंद बनसोडे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)