शिंगोली आश्रम शाळेत वार्षिक तपासणी संपन्न

0
धाराशिव  : शिंगोली आश्रम शाळेत वार्षिक तपासणी संपन्न. विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे , केंद्रिय मुख्याध्यापक शेषेराव राठोड , नायब तहसीलदार स्वामी यांनी शाळेची वार्षिक तपासणी केली. 

शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व वृक्षलागवड करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक खंडू रंगनाथ पडवळ  यांनी सर्वांचा यथोचित शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ देवून व फेटा बांधून सत्कार केला. यावेळी विशाल राठोड, सचीन राठोड, शानिमे कैलास, मदन कुमार आमदापुरे, मल्लिनाथ कोणदे, दिपक खबोले, ज्योती राठोड, बालीका बोयणे, शिक्षिका सुरेखा कांबळे व कर्मचारी गोविंद बनसोडे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top