google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रील २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार , आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार राहणार उपस्थित

ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रील २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार , आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार राहणार उपस्थित

0


ओमप्रकाश राजेनिंबाळकर 16 एप्रील 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

 Dharashiv : 

40-उस्मानाबाद धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता महाविकास आघाडी च्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे  उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत. यावेळी महाविकास आघाडी चे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मा आमदार रोहित दादा पवार, तसेच काँग्रेस आय पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार अमित भैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे .

 धाराशिव शहरातुन 16 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 10 वा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथुन महाविकास आघाडी च्या वतीने रॅलीस  सुरवात होनार असुन ही रॅली धारासुर मर्दिनी मंदिर, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहे , मुख्य रस्त्याने नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारुती मंदिर , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करण्यात येणार आहे. व दुपारी 2 वा जिल्हाअधीकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करनार आहेत

 त्यानंतर धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोरील मैदानावर मा आदित्यजी ठाकरे साहेब, रोहित दादा पवार, अमित भैया देशमुख यांचे मार्गदर्शन होणार होणार आहे

तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, सर्व पदाधीकारी व शिवसैनीक, युवासेना, महीला आघाडी व शिवसेना अंगीक्रत सर्व संघटना यांनी स्वखर्चाने या रॅलीस व सभेस उपस्थीत राहवे असे आवाहन करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top