राज्यात सर्वांनाच पाहिजे फक्त देवाभाऊ, पहिल्या फेजमध्ये आत्तापर्यंत १६ सभा , सव्वाशे सभा होणार
महाराष्ट्र : महाराष्ट्र मधील लोकसभेची निवडणूक सुरू असून प्रचाराचा जोर देखील वाढला आहे. या मध्ये राज्यात सर्वांनाच पाहिजे फक्त देवाभाऊ, म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी म्हणून सर्वच महायुतीच्या उमेदवार आग्रही आहेत . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या फेजमध्ये आत्तापर्यंत १६ सभा झाल्या आहेत.
मोदी - शाह नंतर सर्वाधिक आश्वासक चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस सभेला सर्वाधिक मागणी होताना दिसत आहे. पहिल्या फेजमध्ये आत्तापर्यंत १६ सभा झाल्या असून फडणवीसांच्या सभेला लोकांचाही उस्फुर्त प्रतीसाद मिळताना दिसत आहे.
एकीकडे विरोधकांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या तर दुसरीकडे देवेंद्रजींच्या सभेला जोरदार गर्दी दिसून येते आहे. देवेंद्र फडणवीस राज्सयात सव्वाशे पेक्षा जास्त सभा घेण्यार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकीकडे प्रचार सभांचा धडाका कायम ठेवत दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघातील अडीअडचणी वादविवाद डॅमेज कंट्रोलही एकहाती देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर ठेवत प्रत्येक ठिकाणी बेरजेच राजकारण सुरू आहे.