चार उमेदवारांची निवडणूकीतून माघार , आता ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप

0
धाराशिव दि.23 (प्रतिनिधी ) येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता 31 उमेदवार आहेत.या 31 उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. 

         ज्या 4 उमेदवारांनी 22 एप्रिल रोजी निवडणूकीतून माघार घेतली, यामध्ये विक्रम काळे,बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर यांचा समावेश आहे.
           निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील,पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (चिन्ह-घड्याळ),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, पक्ष-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे,(चिन्ह-मशाल),संजयकुमार भागवत वाघमारे,पक्ष-बहुजन समाज पार्टी (चिन्ह-हत्ती),आर्यनराजे किसनराव शिंदे,पक्ष-राष्ट्रीय समाज दल (आर),(चिन्ह-अंगठी), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, पक्ष-वंचित बहुजन आघाडी (चिन्ह-प्रेशर कुकर),नेताजी नागनाथ गोरे,पक्ष- देश जनहित पार्टी (चिन्ह-शिट्टी),नवनाथ विश्वनाथ दुधाळ,पक्ष-विश्व शक्ती पार्टी (चिन्ह-काडेपेटी),नितेश शिवाजी पवार,पक्ष-हिंदराष्ट्र संघ (चिन्ह-वाळूचे घड्याळ),ॲड.विश्वजीत विजयकुमार शिंदे,पक्ष-आदर्श संग्राम पार्टी (चिन्ह-बॅट),शामराव हरीभाऊ पवार, पक्ष-समनक जनता पार्टी (चिन्ह-जहाज),शेख नौशाद इकबाल, पक्ष-स्वराज्य शक्ती सेना (चिन्ह-हिरा),

 सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई,पक्ष-ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (चिन्ह-पतंग),ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी,पक्ष-समता पार्टी (चिन्ह-बॅटरी टॉर्च),अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष (चिन्ह-बुध्दीबळ पट),उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (चिन्ह-टेबल), काका फुलचंद कांबळे,अपक्ष (चिन्ह-मोत्यांचा हार),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (चिन्ह-भेंडी), गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (चिन्ह-चिमणी),नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (चिन्ह-ऑटोरिक्शा), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (चिन्ह-कपाट),

ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (चिन्ह-भेटवस्तू), नितीन खंडू भोरे,अपक्ष (चिन्ह-गॅस सिलेंडर),मनोहर आनंदराव पाटील, अपक्ष (चिन्ह-शिवणयंत्र),योगीराज आनंता तांबे,अपक्ष (चिन्ह-तुतारी), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (चिन्ह-पेट्रोलपंप),राम हनुमंत शेंडगे, अपक्ष (चिन्ह-फुलकोबी),विलास भागवत घाडगे,अपक्ष (चिन्ह-सितार), शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (चिन्ह-रोड रोलर),समीरसिंह रमेशचंद्र साळवी-अपक्ष (चिन्ह-पाण्याची टाकी),सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (चिन्ह-किटली) व हनुमंत लक्ष्मण बोंदर,अपक्ष (चिन्ह-विजेचा खांब) या उमेदवारांचा समावेश आहे. 
                   *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top