google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकारावर जीवघेणा हल्ला — आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडदप्रतिनिधी

पत्रकारावर जीवघेणा हल्ला — आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडदप्रतिनिधी

0


नळदुर्ग येथे स्थानिक पत्रकार आयुब शेख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून आरोपी अजहऱ मैनुद्दीन शेख (वय 38, रा. नळदुर्ग) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता नळदुर्ग येथील बसस्थानकाजवळील गीरी हॉटेलसमोर आरोपी अजहऱ शेख याने पत्रकार आयुब शेख यांच्यावर धारदार शस्त्राने जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या हल्ल्यात आयुब शेख जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात आरोपी हातात चाकू घेऊन उभा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय षडयंत्राचा संशय अधिक गडद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनांकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकारावर हल्ला करणारे गजाआड!
घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात; राजकीय षडयंत्राचा तपास सुरू!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top