google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 दगाबाज सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले

दगाबाज सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले

0
दगाबाज सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले 

पक्ष बदलणारे बाजार बसवे शेतकऱ्यांना मदत काय करणार ?
करजखेडा येथील शेतकरी संवादास शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

धाराशिव ता.6: अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांची पिके, संपूर्ण संसार व शेतातील माती वाहून गेली. सरकारने ३१ हजार ८०० कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे. मात्र ती रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही. शेतकरी उध्वस्त झाला असताना देखील त्यांना मदत न देणारे पक्ष बदलू, निष्ठूर, पाझर न फुटणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन त्याची पूर्तता न करता त्यांच्याशी दगाबाजी केली आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांची कुणीही चेष्टा व थट्टा केलेली नाही. त्यामुळे या दगाबाजी करणाऱ्या सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे, असा असा प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करीत विरोधकांचा ठाकरे शैलीत खरपूस समाचार घेत त्यांच्या कारभाराची लक्तरे जनतेसमोर  (ता.सहा ) मांडली. दरम्यान, शेतकऱ्यांनी देखील अशा सरकारवर नांगर फिरवावा या उद्देशाने बळीराम नागर ठाकरे यांना भेट दिला.
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी,  शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्यामल वडणे, जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील, श्वेता दुरूगकर, सुरेखा मुळे, मुकेश पाटील, नेताजी गायकवाड,
महेश कारभारी, खंडू शिंदे, सुभाष कळसुले, दत्ता चव्हाण, मारुती दूधभाते, गोविंद गरड, विक्रम भोसले, बालाजी सगट, गणेश चव्हाण, सुधीर गायकवाड, अश्विन पाटील, अशोक आदटराव, महादेव ढोले, चंद्रकांत ताकमोगे, दीपक गायकवाड, शंकर पाटील, बालाजी झांबरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.  ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलो आहे, तुम्हाला मदत मिळाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आलो आहे. मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा मला जे अधिकार मिळाले, त्या अधिकाराच्या माध्यमातून कोरोना काळात मी काम केलं.शेतकऱ्यांनी कर्ज माफी मागितलेली नसताना दोन लाख रुपयांचे कर्ज माफ केले, शिव भोजन थाळी सुरू केली, आनंदाचा शिधा सुरु केला. मी उपकार केले नाही तर मी माझे कर्तव्य केले असे त्यांनी सांगितले. मात्र, या सरकारने खोटे बोलून सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, आनंदाचा शिधा बंद केला. तर आता पूर परिस्थितीचे संकट आल्यानंतर फोटो काढीत मदत करण्यासाठी आले. शेतकरी उध्वस्त झाला असताना शेतकरी कर्जमाफी करावी, हेक्‍टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देणे आवश्यक असताना ते देत नाही. जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे कुठे जातात ? असा सवाल करीत निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा असे म्हणणारे आता कुठे गेला चोरा असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला तर ते तुमच्याकडे भीक मागणार नाहीत. एकीकडे हमीभावापेक्षा कमी भावाने त्यांचे धान्य खरेदी करता. तर दुसरीकडे आदानी यांच्या सिमेंटच्या पोत्याचे भाव हमीभावापेक्षा कमीने का विकत नाहीत ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. तसेच या निमित्ताने उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी घराबाहेर फिरत आहेत असे म्हणणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष बदलू गद्दार, खोके घेणारे व दिल्लीला जाऊन मुजरा करणारे असून ते आम्हाला विचारणारे कोण ? अगोदर घर संभाळा अशी जबरदस्त टीकास्त्र शिंदे यांच्यावर सोडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक प्रचार दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करणार..तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकतीस तारखेच्या आत कर्जाची रक्कम भरा मी कर्जमाफी नाही केली तर पवाराची अवलाद नाही असे जाहीर सांगणाऱ्या... दोघांच्या क्लिपा उपस्थितितांना ऐकवल्या. दरम्यान, लाडकी बहीण योजनि बंद करू नका, त्याऐवजी प्रत्येक घरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...........

महार वतनाची जमीन उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुत्रास कोणत्या निकषांवर दिली ?

पुणे येथील भीमा कोरेगाव परिसरात असलेली महार हाडोळ वतनाची ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुत्र पार्थ यांच्या कंपनीस कोणत्या निकषांवर दिली ? त्या जमिनीचे बाजार मूल्य कमीत कमी १८०० कोटी रुपये आहे. मात्र, ते ३०० कोटी रुपयांचे दाखवले आहे. रेडी रेकनर दरानुसार त्याचे व्यवहार होणे आवश्यक आहे, त्याचे मुद्रांक शुल्क भरून न घेता मुद्रांक शुल्क माफ केले आहे. सर्व नियमांना गुंडाळून ही जमीन दिली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आमदार रावसाहेब दानवे यांनी केला. विशेष पुण्यातच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे जैनांचे होस्टेल हडप करतात. त्यामुळे लुटमारीचा प्रकार चालू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ का मेवा भाऊ म्हणावे ? अशी टीका त्यांनी केली. महार हाडू वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला देणे हे चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाकाने कांदे सोलत असल्यामुळे त्यांना याचा जबाब द्यावाच लागेल असा जबर हल्ला दानवे यांनी चढविला. तसेच राज्य सरकारने रडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी साडेतीन लाख रुपये देण्याची जी घोषणा केली ती फसवी असून एक रुपया देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे ते दिवास्वप्न असल्याचे सांगत राज्य सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले.
 

.......

सोयाबीन ११ रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत होते. मात्र, मोदी सरकारने विदेशातून सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनचे भाव पडले असून ते आज साडेतीन ते चार हजार रुपये प्रती क्विंटल दराने विकावे लागत आहे. सोयाबीनला ११ हजार रुपये हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे भिकेचा कटोरा मागायला येणार नसल्याचे खा राजेनिंबाळकर यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमच्याकडे मते मागायला आले नाही नसून ते तुमच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यासाठी आलेले आहेत. तर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये उभारून दाखवावे. त्यापैकी शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली ? हे शेतकरी तुम्हाला दाखवतील, असे आव्हान खा राजेनिंबाळकर यांनी सरकारला दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top