उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, कळंब: संदीप विष्णु ठोंबरे, रा. बाबानगर, कळंब यांच्या शेळका धानोरा शिवारातील खडी क्रशर क्रेंद्रावरील कामगार- 1)पंडीत संदीपान शेळके 2)विक्रम अंबऋषी करडे, दोघे रा. बोर्डा, कळंब 3)रंगनाथ नागनाथ शेळके, रा. धानोरा (शेळका) यांनी खडी केंद्रातील डंपर मधील 20 लीटर डीझेल दि. 01.12.2020 रोजी 20.30 वा. सु. चोरले तर 4)जावेद मध्यखान पठाण, रा. खामसवाडी, ता. कळंब यानेही तेथील डंपरमधील डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या संदीप ठोंबरे यांनी काल दि. 02.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: अंबऋषी आण्णा अंधारे, रा. भांडगांव, ता. परंडा यांनी त्यांची हिरो मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 4481 ही दि. 26.11.2020 रोजी 23.00 वा. सु. राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ती मो.सा. त्यांना ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अंबऋषी अंधारे यांनी दि. 02.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: सोमनाथ शिवाजी माळी, रा. कुलकर्णी गल्ली, उमरगा यांनी त्यांची होंडा ड्रीम युगा मो.सा. क्र. एम.एच. 25 एबी 7228 ही दि. 29.11.2020 रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सोमनाथ माळी यांनी दि. 02.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: विसर्जन विहीर परिसरातील शासकीय निवासस्थानांच्या आवारात असलेली 3 चंदनाची झाडे अज्ञात चोरट्याने अंधाराचा व दाट झाडीचा फायदा घेउन दि. 03.12.2020 रोजी 02.00 ते 04.00 वा. सु. तोडून चोरुन नेली. यावरुन पोलीस अंमलदार- विक्रम देशमुख यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: संजय सुखदेव सोनवने, रा. राजापुर, ता. संगमनेर यांनी दि. 03.12.2020 रोजी 02.30 वा. सु. शुक्रवार पेठ येथे त्यांची कार लावली होती. परत 04.30 वा. सु. कारकडे आले असता कारमधील पर्ससह सोन्या- चांदीचे दागिने व 15,000 ₹ रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांना दिसले. अशा मजकुराच्या संजय सोनवने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.