राज्यात रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहान
महाराष्ट्र :- कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आज cmmaharashtra या ऑफिशियल पेज वरून हि माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करून रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशी माहिती cmmaharashtra फेसबुक पेज वरुन देण्यात आली आहे.