(लोहारा प्रतिनिधी)
शेतकरी विरोधी कृषी विषयक कायदे रद्द करणे तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलना वरील दडपशाही थांबविण्यात यावे व शेतकरी वर्गाची थेट चर्चा करून तोडगा काढावा अन्यथा पुढील मागण्या सह महाराष्ट्रातील शेतकरी देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन लोहारा तहसीलदार मार्फत माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांना लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की आपण आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्वच नष्ट होत आहे शेतकरी आसमानी सुलतानी संकटाने होरपळून जात आहे कंत्राटी शेती कायदा 2020 शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी व वीज मुबलक सहज उपलब्ध व्हावे यासाठी पंजाबराव देशमुख यापासून सतत मागणी केली जात आहे तसेच कंत्राटी शेती कायदा लागू करून सदर कंत्राटी विरोधात दीवानी दाद मागण्याचा ही अधिकार आपण शेतकऱ्यांना ठेवलेलं नाही अत्यावश्यक वस्तू कायदा 2020 व्यापारी वर्गाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी असलेला पूर्वीचा अत्यावश्यक वस्तू कायदा अजून सुधारणा करून मजबूत करण्याऐवजी आपण सदर कायद्यात व्यापाऱ्यांना वारेमाप साठेबाजी करण्यासाठी एक प्रकारे सवलत केली आहे त्यामुळे ज्या काही निवडक शेतीमालाला तरी वाढीव भाव मिळायचा तोही आता मिळणे शक्य नाही आपल्या अशा अन्यायकारक कायद्यामुळे शेतकरी संपूर्णता उध्वस्त होत आहे यामुळे देशभरातील शेतकरी बांधवातून तीव्र रोष व्यक्त केले जात आहे याचाच परिणाम म्हणून दिल्लीत जगाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरलेला असताना दिसत आहे या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी आपल्या एक हाती सत्तेच्या जोरावर शेतकरी बांधवाचा आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न करत आहात तो लोकशाही व्यवस्थेला धरून नाही आणि आपण पदाचा शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध वापर करत असल्याचे दिसून येत आहे यासाठी शेतकरी वर्गाची थेट चर्चा करून तोडगा काढावा अन्यथा पुढील मागण्या सह महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाद्वारे पंतप्रधान यांना केलेल्या मागण्या
---------------------------------------
शेतकरी विरोधी खालील नमूद काळे कायदे रद्द करण्यात यावी
1----- शेतीमाल विक्री कायदा 2020
2------ कंत्राटी शेती कायदा 2020
3------ अत्यावश्यक वस्तू कायदा 2020
4------ स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
5---- दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला वरील दडपशाही तात्काळ थांबवावी
6---- दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या वरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे
7------- आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी वीजबिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे आधी मागण्याचे निवेदन लोहारा तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले असून या निवेदनावर लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार,महादेव पवार ,गहिनीनाथ जांभळे, मनोज देशपांडे, बालाजी मातोळे,नितीन शिरगिरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत