google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजापूर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 (खुर्द) शाळेत डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

तुळजापूर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 (खुर्द) शाळेत डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

0
तुळजापूर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3  (खुर्द) शाळेत डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन


तुळजापूर :-  तालुक्याचे आमदार मा.श्री. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या शुभहस्ते नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला ऑल इन वन पीए साऊंड सिस्टिमव cctv संच,स्मार्ट टीव्ही, संगणक या सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी तुळजापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष मा.श्री.सचिन (भैय्या) रोचकरी अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विनोद(पिटू) गंगणे युवा नेते तुळजापूर हे उपस्थित होते

 कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला तुळजापूर खुर्द मधील श्री.बाबुराव(तात्या) पुजारी ,श्री.त्रिंबक(भाऊ) भोजने ,श्री.वसंत (तात्या)म्हेत्रे, श्री.गौतम जगदाळे या ज्येष्ठ नागरिकांनी तुळजाई परिवार  व तुळजापूर खुर्द नागरिकांच्या वतीने कोरोना काळात तुळजापूर (खुर्द) व परिसरातील नागरिकांसाठी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या तसेच हॅन्डवॉश, सॅनिटायझर इत्यादीचा पुरवठा केल्याबद्दल व तुळजापूर मतदारसंघातील नागरिकांना कोरोना काळामध्ये विविध आरोग्यविषयक सुविधा देऊन मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल तुळजापूर खुर्द येथील जेष्ठ नागरिकांनी सन्मान कर्तुत्वाचा हे सन्मानचिन्ह व मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन माननीय आमदार राणाजगजितसिंहजी  पाटील यांचा सत्कार केला.

या वेळी आमदार महोदयांनी शाळेची होत असलेली झपाट्याने वाढ लक्षात घेता, शाळेस नियोजित सुसज्ज इमारतीसाठी नियोजित जागा, किचन शेड तसेच राज्याची मॉडेल स्कूल मध्ये समावेश करणेबाबत ही पाठपुरावा केला जाईल याची ग्वाही दिली या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष श्री.सचिन (भैय्या) रोचकरी युवा नेते श्री. विनोद (पिटू )गंगणे,व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. सतीश दंडनाईक, नगर पालिकेचे शिक्षण सभापती श्री.किशोर (भाऊ)साठे, महिला बालकल्याण उपसभापती सौ. मंजुषा (ताई) देशमाने, नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे, माजी नगराध्यक्ष मा.श्री. बापूसाहेब कणे श्री.विजय(आबा )कंदले , श्री .नागेश (नाना )नाईक, श्री. माऊली भोसले तसेच माजी नगरसेवक श्री.नारायण(भाऊ) नन्नवरे , श्री.प्रसाद (भाऊ) देशमाने, तुळजाई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.आदिनाथ (भाऊ)ठेले, तुळजाई पतससंस्थेचे चेअरमन श्री.राजाभाऊ देशमाने, श्री.गुलचंद व्यवहारे श्री.प्रसाद पानपुडे श्री इंद्रजीत साळुंके श्री.श्याम भोजने ,श्री.नाना भोजने,श्री.राम भोजन, श्री.राजु डोके तसेच तुळजाई पतसंस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला राज्य शिक्षक संघाचा 2019-20 सालचा  राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मा.आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे, सहशिक्षक श्री.अशोक शेंडगे ,श्री.बालाजी साळुंके, श्री.जालिंदर राऊत ,श्री.विश्वजीत निडवंचे तसेच शिक्षिका श्रीमती गायकवाड नीता, श्रीमती कुलकर्णी निर्मला,श्रीम. सय्यद यास्मिन व शा पो आ मदतनीस श्रीमती कल्पना व्हटकर,सेवक सौ. मिनाबाई वाळा व वॉचमन श्री.संजित देडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री.प्रकाश मगर सर यांनी केले

बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top