google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी प्रविण प्रभाकर पाठक यांची एकमताने निवड

उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी प्रविण प्रभाकर पाठक यांची एकमताने निवड

0

उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पार्टीचे प्रविण प्रभाकर पाठक यांची एकमताने निवड झाली, उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी  झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली,

उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रवीण पाठक यांच्या निवडीला समर्थन दिले. भारतीय जनता पार्टी यांनी प्रवीण पाठक यांच्या निवडीचा ठराव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. भारतीय जनता पार्टीचे गटनेते सौ.राणी  दाजी आप्पा पवार यांनी प्रवीण पाठक यांच्या निवडीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे तसेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या कडे दाखल केला होता. त्यानुसार दि.30 मार्च रोजी सर्वसाधारण सभेने या ठरावाला मान्यता दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top