आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा समितीची स्थापना
उमरगा / प्रतिनिधी
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी गायकवाड व सचिव पदी श्री सुखदेव होळीकर यांची निवड उमरगा येथे दि 1 सप्टेंबर 2021 रोजी उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांची बैठक होऊन उमरगा शहरामध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे ठरले असून यावेळी एकमताने पुतळा कृती समिती स्थापन करण्यात आली यावेळी पुतळा कृतीसमितीची खालील प्रमाणे पदाधिकार्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी शिवाजीराव गायकवाड कार्याध्यक्षपदी श्री बालाजी गायकवाड उपाध्यक्षपदी श्री राजाभाऊ शिंदे श्री संजय सरवदे सचिवपदी श्री सुखदेव होळीकर सहसचिव पदी सतीश कांबळे कोषाध्यक्ष बबनराव बनसोडे सदस्यपदी सुधाकर बनसोडे शिवाजी दुणगे वाघबर सरवदे व सल्लागारपदी दिलीप गायकवाड यांची निवड करण्यात आली बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून संविधान बचाव परिषदेचे अध्यक्ष अशोकराजे सरवदे उपस्थित होते यावेळी निवृत्त कर्मचारी वाय,एस शिंदे श्रीमंत दुणगे नागेश कांबळे मेजर कांबळे हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी शिवाजी दुंनगे हे उपस्थित होते यावेळी अशोकराजे सरवदे बोलताना म्हणाले समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीतून निर्माण करावा असे त्यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड यांनी कसल्याही परिस्थितीत एक वर्षात अण्णाभाऊचा पूर्णाकृती पुतळा उमरगा शहरात उभा करणार अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गायकवाड यांनी केली सूत्रसंचालन सुखदेव होळकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार केशव सरवदे यांनी मानले यावेळी नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,