उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल 

बेंबळी पोलीस ठाणे : लिंबराज श्रीरंग पवार, रा. लासोना, ता. उस्मानाबाद हे दि. 12- 13 ऑगस्ट च्या रात्री त्यांच्या बांधकाम चालू असलेल्या घरासमोर झोपले असता पहाटे 03.00 च्या सुमारास लिंबराज पवार यांच्या उशाचा स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

परंडा पोलीस ठाणे : बाहुबली कवठे, रा. कपिलापुरी, ता. परंडा यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने दि. 31.08.2021 ते 01.09.2021 दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, एक एलईडी टीव्ही व एक स्मार्टफोन असे साहित्य चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आनंदनगर पोलीस ठाणे : आण्णासाहेब बंडगर, रा. धारुर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 3283 ही दि. 31.08.2021 रोजी 09.20 ते 18.30 वा. दरम्यान उस्मानाबाद न्यायालयाच्या आवारात लावून न्यायालयात कर्तव्यावर गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांची नमूद मोटारसायकल अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उमरगा पोलीस ठाणे : नागनाथ यशवंत भोसले, रा. एसटी कॉलनी, उमरगा हे दि. 31.08.2021 ते 01.09.2021 दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने तोडून घरातील 10 ग्रॅम वनाचे सुर्वण दागिने व 160 ग्रॅम चांदीचे दागिने, वस्तू चोरुन नेल्या. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top