चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखा : भ्रमणध्वनी चोरीस गेल्याने उस्मानाबाद (श.) पो. ठा. येथे गु.र.क्र. 146 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषन करण्यात आले. शेवटी स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मारलापल्ले, कावरे यांच्या पथकाने साठे चौक, उस्मानाबाद येथील विठ्ठल पवार या 21 वर्षीय तरुणास चोरीच्या स्मार्टफोनसह आज दि. 02 सप्टेंबर रोजी ताब्यात घेउन उस्मानाबाद (श.) पो. ठा. च्या ताब्यात दिले आहे.