शिव मल्हार संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
उस्मानाबाद :- शिवमल्हार संघटनेच्या वतीने जागतिक माहिला दिनाचे औच्युत साधुन दि.८ मार्च सोमवार रोजी खानापुर येथे सामाजिक कार्यक्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या आर्दश माहिला भगिनीचा सत्कार करुन  स्ञी शक्ती असलेल्या माँ.जिजाऊ,आहिल्याबाई होळकर व रमाबाई आंबेडकर थोर महान माहिला भगिनीची प्रतिमा भेट देवून,यथोचित  सत्कार करण्यात आला.या वेळी शिव मल्हार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संगिता ढोकळे म्हणाल्या की, माहिला वर्गानी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे माहिलांनी सजग राहुन काम करण्याची जिद्द जोपासावी माहिलांवरील अत्याचार अजुनही थांबले नाहीत माहिलांना आजही कांही प्रमाणात अत्याचाराचा सामना करावा लागत आहे माहिला वर्गानी आपण एकञीत येत ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याठिकाणी वाचा फोडण्याचे काम करावे माहिलावर्गानी सामाजिक क्षेञात काम करुन संधीचे सोने करावे असे मत व्यक्त केले. या वेळी शिव मल्हार संघटनेच्या, जिल्हा सचिव  कविता काळे शहर अध्यक्षा सुनिता कोळेकर मिनाक्षी सोनवणे आदीसह माहिला भगिनी उपस्थित होत्या.
बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर 

 
   

 
 
 
 
 
 
 
