पूरग्रस्त भागात शिलेदार फाऊंडेशनचे भरीव मदत कार्य

0

पूरग्रस्त भागात शिलेदार फाऊंडेशनचे भरीव मदत कार्य

वार्ताहर - 

महाड, चिपळूण तसेच कोकणातील काही भागांसह सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पुरामुळे भयंकर नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने अनेक आलेल्या महाकाय पूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. 

महाड पुराची माहिती कळताच युवराज्ञी संयोगितेराजे छत्रपती याच्यां मार्गदर्शनाखाली शिलेदार रेस्कु टिम रात्रीचा प्रवास करुन महाड येथे दाखल झाली. NDRF टिमसोबत महाड येथे बचावकार्य सुरु करण्यात आले. त्यानंतर लगेचच 
तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बचावकार्य करण्यासाठी  NDRF टिमसोबत शिलेदार रेस्कु टिम पोहोचली होती. प्रशासन व स्थानिक लोकांच्या सोबत तीन दिवस शोधकार्य करून 53 मृतदेह मातीच्या ढिगा-यातुन काढण्याचे काम केले. यामध्ये शिलेदार रेस्कु टीमचा महत्वाचा सहभाग होता.

   शिलेदार फाऊंडेशन ने पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संघटना, सेवाभावी परिवार, धार्मिक संस्था, मंडळे यांनी पुढाकार घेऊन नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे तसेच आर्थिक स्वरूपातील मदतीचे संकलन सुरू केले.
शिलेदार फाऊंडेशन चे स्वयंसेवक आणि स्थानिक गावकरी यांच्या मदतीने हे सर्व मदत साहित्य पूरग्रस्त भागांत पोहोचवण्यास सुरुवात केली.

गेल्या आठवडा भरात महाड परिसरात 5 टन अन्नधान्य व चिपळूण परिसरात 10 टन अन्नधान्य व 500 भाडीं सेट कपडे चटई व संसार उपयोगी साहित्य अनेक बाधित गावांत, राज्यभरातील अनेक ठिकाणांहून आलेली मदत पोच करण्यात आली. पुढे टीमच्या माध्यमातून  सांगली कोल्हापुर भागात कर्तव्यपर मदतकार्य करण्यात येणार आहे.

राज्यभरातील अनेक ठिकाणाहून सुरू झालेल्या मदतीच्या या ओघाने माणुसकीच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

संस्थेच्या या कार्यासाठी *युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती याचें मार्गदर्शन लाभत आहे.


- लहानपनापासुनच राष्ट्रसेवेची आवड असल्याने हे कार्य करत असताना समाधान मिळते. महाड परिसरात कर्तव्य करत असताना आपल्या कोल्हापुर येथील घरी पुराचे पाणि  आले हे समजले पण त्याचाही विचार न करता हाती घेतलेले कार्य करत राहणे हे कर्तव्य समजुन कार्य अविरत सुर आहे. या कार्यात शिलेदार संस्थेच्या सर्व शिलेदाराचां, संलग्न सर्व संस्थाचा तसेच समाजातील सर्व दानशूर व्यक्तिचां सहभाग कौतुकास्पद आहे.- गिर्यारोहक सागर नलवडे, कोल्हापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top