राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भभावना दिवसाची शपथ
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भभावना दिवसाची शपथ घेण्यात आली.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रताप काळे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, महसूलचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, नायब तहसीलदार (आस्थापना) कुलकर्णी आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****