विद्युतपंप चोरीचा पर्दाफाश, ३ आरोपींच्या ताब्यातून ६ गुन्ह्यांतील ६ पंप जप्त.
तुळजापूर तालुक्यातील , तामलवाडी पोलीस ठाणे : वडगाव, ता. तुळजापूर येथील 1) विजय भालचंद्र काळे, वय 25 वर्षे, 2) सागर माणिक पवार, वय 25 वर्षे, 3) देविदास रामा पवार, वय 35 वर्षे, हे तीघे चोरीचे विद्युतपंप बाळगुन असल्याची गोपनीय खबर तामलवाडी पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर तामलवाडी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी सपोनि- श्री. सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. घुले, पोहेकॉ- गायकवाड, पोशि- सुरणार, शिरसाट, शेख यांच्या पथकाने दि. 01 ऑगस्ट रोजी त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 08, 19, 63, 88, 116, 132 / 2021 या भा.दं.सं. कलम- 379 प्रमाणे दाखल 6 गुन्ह्यांतील एकुण 6 विद्युतपंपासह चोरीकरण्यास वापरलेल्या दोन मोटारसायकली त्यांच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.