जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने २५० कीटचा ट्रक पुरग्रस्तांसाठी रवाना
उमरगा (महादेव पाटील)
उमरगा येथील जमियत उलेमा-ए-हिंद या सामाजीक संघटनेच्या वतीने संकटात सापडलेल्या पूरग्रस्त कुटूंबासाठी सोमवारी (दि 2 ) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. अनुराधा उदमले यांच्या उपस्थितीत २५० कीट असलेल्या जिवनावश्यक वस्तुच्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण टोंपे, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव , कॉ. अरुण रेणके, जमियत उलेमा-ए-हिंदचे उमरगा तालुका अध्यक्ष मौलाना गुलाम नबी बलसुरी, तालुका सचिव हाफिज युसूफ,नगरसेवक आतीक मुन्शी, मुस्लिम जमात कमिटीचे तालुका अध्यक्ष बाबा औटी, रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. उदमले यांनी अशा आपत्तीवेळी विविध सामाजीक संघटनांनी पुढे येवुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करुन मुस्लीम युवक करत असलेल्या समाज कार्याचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक श्री.आघाव यांनी उमरगा हे सामाजीक सलोखा असलेला तालुका असुन येथील नागरीक नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावुन येत असतात असे मत व्यक्त केले. श्री. टोपे, श्री. जाधव यांची यावेळी भाषणे झाली.
यावेळी हाफीज वशीम मळगे, हाफीज मोहसीन, हाफीज एजाज शेख, कलीम पठाण, मदन शाह मूर्शद, परवेज सौदागर, तोफिक शेख, हाफिज सादिक, हाफिज सज्जाद,अब्दुल गनी शेख, अहमद शेख, अब्दुल अजीज खालीदी उपस्थित होते. हाफीज गुलाम नबी बलसुरी यांनी प्रास्ताविक केले. हाफीज युसुफ यांनी आभार मानले.
यासाठी शमसुद्दीन शेख, जफर पठाण, वजीर शेख, मेहराज मनियार व जहीर सय्यद आदींनी परिश्रम घेतले .हाफिज युसुफ, जाहेद मुल्ला , इस्माईल शेख, वसीम नदाफ आदी युवक गाडीसह पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ट्रकसोबत रवाना झाले .
हेही वाचा...