मधमाशा पालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मधमाशा पालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        

    उस्मानाबाद,दि.31(जिमाका):-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना मधमाशापालन संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे.पात्र शेतकरी व्यक्ती/संस्थाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.


योजनेचे वैशिष्टे :- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी मधमाशा संरक्षण संवर्धनाची जनजाग्रती योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- वैयक्तिक मधपाळासाठी पात्रता अर्जदार साक्षर असावा.स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.



      केंद्र चालक / प्रगतशील मधपाळ पात्रता किमान दहावी पास वय 21 वर्षापेक्षा जास्त आशाव्यक्तीच्या नांवे किंवा त्याव्यक्तीच्या कुंटूबातील व्यक्तीच्या नांवे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन आणि मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि सुविधा असावी. केंद्र चालक संस्थेसाठी पात्रता - संस्था नोदणीकृत असावी, तसेच एक एकर शेत जमीन स्वमालकीची /भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन आणि मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देणेची क्षमता असलेले सेवक असावेत.यासाठीच्या अटी आणि शर्ती लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबधी मंडळास बंदपत्र लिहून देणे आणि लाभार्थीची स्वगुंतवणूक रक्कम मंडळाकडे भरावी तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.




   अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा, जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारती समोर, उस्मानाबाद -413501  दूरध्वनी :- (02472) 222301  येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top