बेंबळी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश..
उस्मानाबाद :- तालुक्यातील बेंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहम्मद शेख यांनी शिवसेना पक्षात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा उस्मानाबाद- कळंब आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरीत होऊन, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण, पर्यटक व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. मंत्री प्रा. डॉ. आ. तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहम्मद शेख यांचे आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, अतिक सय्यद, अमन शेख, उबेद शेख उपस्थित होते.