महाआवास अभियानात लोहारा पंचायत समिती तसेच धानुरी ग्रामपंचायत औरंगाबाद विभागात दुसरी

0

महाआवास अभियानात लोहारा पंचायत समिती  तसेच धानुरी ग्रामपंचायत औरंगाबाद विभागात दुसरी


लोहारा  /  प्रतिनिधी

 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने दि.२० नोव्हेंबर २०२० ते ५ जुन २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या महाआवास अभियानात पंचायत समिती लोहाराने राज्यस्तरीय आवास योजनेत  औरंगाबाद विभागात द्वितीय व लोहारा तालुक्यातील धानुरी येथील ग्रामपंचायतने ग्रामपंचायत स्तरावरील द्वितीय पुरस्कार पटकावला असुन दि.३ सप्टेंबर रोजी  विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मा.विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मा.जि.प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता ,मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिलकुमार नवाळे,पंचायत समिती लोहाराच्या मा.सभापती हेमलताताई रणखांब मा.गटविकास अधिकारी श्री.सोपान अकेले ,जिल्हास्तरीय प्रोग्रामर मेघराज पवार, तालुकास्तरीय डीईओ प्रविण शेटे ,धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव तसेच ग्रामपंचायत धानुरीचे सर्व सदस्य उपस्थित  होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top