राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
उस्मानाबाद :- आज प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय उस्मानाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते व धाराशिव शहर तसेच ग्रामीण भागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिमा पूजन झाल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्राबद्दल नितीन काळे यांनी उपस्थित सर्वाना थोडक्यात माहिती दिली.
तसेच प्रदेश सरचिटणीस मा. आ. सुजीतसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व युवा मोर्चाचे तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध घोषणा देत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले, व प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, रामदास कोळगे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, अभय इंगळे, डॉ प्रशांत पवार, तसेच भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, विनायक कुलकर्णी, पूजा देडे, अर्चना अंबुरे, ॲड.कुलदीपसिंह भोसले, रोहित दंडणाईक, ओम नाईकवाडी, गणेश एडके, दाजीप्पा पवार, बालाजी कोरे, विनोद निंबाळकर, महेश बागल, पूजा राठोड, देवकण्या गाडे, विद्या माने, प्रीतम मुंडे, मेसा जानराव, सलमान शेख, प्रसाद मुंडे, सुधीर एकंडे, सार्थक पाटील, सागर दंडणाईक व शहर तसेच ग्रामीण भागातील भाजप व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.