आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत वाघोली येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती व तिरंगा रॅली संपन्न

0



आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत वाघोली येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती व तिरंगा रॅली संपन्न


उस्मानाबाद :- आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती असुन संपुर्ण भारतातच नव्हे तर जगभरात त्यांची जयंती साजरी करण्यात येते.

 जिल्हयातील वाघोली या गावात महात्मा गांधीजी यांच्या पुर्णाकृती पुतळा असुन आज त्यांच्या जयंती निमीत्त भाजपाचे तुळजापुर विधान सभा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वाघोलीतील बापुजींच्या पुतळयास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच वाघोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास ही पुष्पहार अपर्ण करण्यात आले आणि नंतर गावातुन तिरंगा ध्वज हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा देत समस्त ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी यांच्या सोबत तिरंगा रॅली काढण्यात आली.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णीप्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड खंडेराव चौरे, रामदास कोळगे, जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकरराजाभाऊ पाटील, वाघोली गावातील ओमप्रकाश मगरसतिश खडकेप्रदिप पाटील, बाळासाहेब पवारपरमेश्वर पाटीलदिलीप पाटीलप्रकाश मगरप्रशांत शिनगारे, उमेश वसंत मगरअमोल पवारमहेश उंबरेआनंद खडकेदिनेश उंबरेसुशील खडकेनाना माळी, रोहन पाटीलतसेच गावातील भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top