रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार केलेल्या गाय दूधाचा २९८ लिटरचा साठा नष्ट : उस्मानाबाद जिल्ह्यातील व मराठवाड्यातील दूधडेरी ,उत्पादन केंद्र तपासणी करण्याची गरज!

0

रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार 
केलेल्या गाय दूधाचा २९८ लिटरचा साठा नष्ट 

सोलापूर : दूध भेसळीच्या संदर्भात प्राप्त खात्रीशीर गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दक्षता विभाग मुंबई, अन्न व औषध प्रशासन सोलापूर व इतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत सांगोला तालुक्यातील देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्या मालकिच्या मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार केलेल्या गाय दूधाचा सुमारे २९८ लिटरचा साठा नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

सदर तपासणीदरम्यान पेढीमध्ये दुध भेसळीकरीता लिना निळ (अपमिश्रक) या कंपनीच्या ५०० मि.लि. चे १० सील बंद बॉटल आढळून आल्या. तसेच सदर पेढीच्या बाजूंला असलेल्या युवराज भगवान अलदार (भागीदार) यांच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्ड चे २५ किलोग्रॅमचे ३ बॅग आढळून आल्या.

सदर ठिकाणी लिना निळ (अपमिश्रक) बाबत रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गाय दूधामध्ये टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरुन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स  या पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर सदर ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित १) गाय दूध २९८ लिटर  किंमत ८, ०४६ रुपये, २) व्हे पावडर- (अपमिश्रक) ७४ किलोग्रॅम किंमत १२०७४ रुपये, ३) निळ (अपमिश्रक) (लीना) - ६ बॉटल - किंमत ५४० रुपये असे एकूण - २०६६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

 त्यानंतर सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीस मंजुर असलेला अन्न परवाना रद्द करण्यात आलेला आहे. 

सदर प्रकरणी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स या पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर ५ भागीदार तसेच सदर पेढीकडून भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम ३४, २७२, २७३, ४२० व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत  सांगोला पोलीस स्टेशन, सांगोला येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. तसेच विक्रेता पेढी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स तसेच पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)  यांनी दुधात भेसळीसाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या निळ या रासायनिक पदार्थाचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द अतिरिक्त भा. दं. वि. कलम ३२८ व अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे कलम ३८ (६) व कलम ५९ नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे.  सदरची कारवाई दिनांक २३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

सदरची कारवाई आयुक्त परिमल सिंग, व पुणे विभागाचे सह आयुक्त, शिवाजी देसाई, तसेच व प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न), सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनातील दक्षता विभाग सर्वश्री ज्ञानेश्वर महाले, अन्न सुरक्षा अधिकारी, अरविंद खडके, राम मुंडे, मिलिंद महागंडे, अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, श्री. रोहन शहा, कोल्हापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे, महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली.


तसेच मराठवाड्यात उस्मानाबाद , लातूर सह इतर जिल्ह्यांमध्ये दूध संकलन करून विक्रीसाठी तयार करणाऱ्या अनेक उत्पादन डेरी आहेत . प्रशासनाने या ठिकाणी तपासणी करण्याची गरज आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top