उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी
उस्मानाबाद : - दि.१ ( प्रतिनिधी ) उस्मानाबाद जिल्ह्यात नुकतीच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून हातात आलेले पीक वाया गेलेले आहे . त्यामुळे त्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून विमा संरक्षण अंतर्गत हेक्टरी पंचवीस हजार रुपये सरसगट नुकसान भरपाई म्हणून शासनाने तात्काळ मदत करावी . अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे करण्यात आली ..यावेळी वंचित बहुजन महीला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा एडवोकेट जिनत प्रधान, जिल्हा महासचिव बाबासाहेब , प्रवक्ते एडवोकेट के .टी. गायकवाड , महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई लोखंडे, जिल्हा संघटक सुजाता बनसोडे, कोषाध्यक्ष रुक्मिणी बनसोडे , सोमनाथ नागटिळक , विजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते .