बामणी येथे प्रहार संघटनेच्या शाखेचे उदघाटन

0

बामणी येथे प्रहार संघटनेच्या शाखेचे उदघाटन


उस्मानाबाद / बामणी :-  प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथे शाखा स्थापन करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष मयूर काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच शाखेच्या वतीने दिव्यांग व्यक्तिकरिता काम करणारे मयूर काकडे यांचे गावकऱ्याकडून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. 



यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोहिते,  जिल्हा कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे, शहराध्यश  जमीर शेख, सदस्य शिवकुमार माने, याची प्रमुख उपस्थिस्ती होती. 


यावेळेस शाखाध्यक्षपदी शंकर चव्हाण, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर गरड निवड करण्यात आली. तसेच यावेळी युवा नेते काका शेळके, उपसरपंच शंभू तोडकरी, ताड हिपरगा ग्रामसेवक आण्णा गवळी, शंकर मुळे, शिवकुमार चाकुरे, पाडुरंग पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ याच्या उपस्थित मध्ये 103 व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top