पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांशी संवादाच्या थेट प्रक्षेपणाचे पंचायत समिती येथे आयोजन

0



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांशी संवादाच्या थेट प्रक्षेपणाचे पंचायत समिती येथे आयोजन

उस्मानाबाद ;- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राकृतीक शेती, नैसर्गिक शेती या विषयावर देशातील शेतकऱ्यांना थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातुन मार्गदर्शन केले. 

हे थेट प्रक्षेपण कार्यक्रम देशभरात सर्वत्र शासकीय व निमशासकीय ठिकाणी तसेच भाजपा कार्यालयात राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने  पंचायत समिती उस्मानाबाद येथे श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष , किसान मोर्चाचे रामदास कोळगे, पंचायत समिती उपसभापती प्रदिप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पवार, तालुका सरचिटणीस नामदेव नायकल, भाजप नेते महेश चांदणे, संजय लोखंडे, बालाजी गावडे, विद्या माने, यांच्यासह पंचायत समिती सदस्य, शेतकरी बांधव व पदाधिकारी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top