लोहारा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात ९ जोडप्यांच्या विवाह संपन्न झाला.
लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी अस्लम बदेनवाज सय्यद यांनी सामाजिक भावना जपत स्वखर्चातुन मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. रविवारी (दि. २७) सायंकाळी ७ च्या सुमारास हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस मसुदभाई शेख, कादर खान, असद पठाण, तौफिक शेख, इफतेकार पटेल, वकिल शेख, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे, अमिन सुंबेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, बाळासाहेब पाटील, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, वामन भोरे, प्रा. महेश मोटे, पत्रकार इकबाल मुल्ला, पत्रकार गिरीश भगत, रफिक पटेल, मुन्ना जाधव, गौस शेख, रौफ बागवान, प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लायक कादरी, तौफिक कमाल, अजिज सय्यद, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, साहेबलाल शेख, जाकिर कुरेशी, अश्फाक शेख, ओम पाटील, यासिन शेख, वजिर मनियार, संतोष फावडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.