निवृत्तीवेतन धारकांना आयकरपात्र उत्पन्नावरील आयकर समान हप्तयांमध्ये कपात करणे बंधनकारक जिल्हा कोषागार अधिकारी

0

निवृत्तीवेतन धारकांना आयकरपात्र उत्पन्नावरील आयकर समान हप्तयांमध्ये कपात करणे बंधनकारक जिल्हा कोषागार अधिकारी

Osmanabad news :- 

उस्मानाबाद,दि.29():- येथील जिल्हाकोषागार कार्यालय येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांना आयकर अधिनियमानुसार आयकरपात्र उत्पन्नावरील आयकर समान हप्तयामध्ये कपात करणे बंधनकारक आहे. असे जिल्हा कोषागर अधिकारी सचिन इगे यांनी कळविले आहे.

 त्यानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आयकरपात्र उत्पन्न असणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे आयकर त्यांच्या निवृत्तीवेतनामधून समान हप्त्यामध्ये कपात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या निवृत्तीवेतन धारकांनी बचत केलेली असेल त्यांनी त्यांन्चे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करवीत. तसेच सन २०२१-२२ हे आर्थिक ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होत असल्याने, मार्च २०२२ चे सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे आणि कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे मासिक निवृत्तीवेतन हे एप्रिल २०२२ मध्ये शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर संबंधित बँकामार्फत अदा करण्यात येईल, असेही जिल्हा कोषागर अधिकारी सचिन इगे यांनी कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top