धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

0




धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

 धाराशिव:- 

उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)व्यंकट चक्रपाणी तेलंग,  वय 35 वर्षे, रा. कोळसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 2,600 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 1)लोकेश चंद्रशेखर बलसुरकर, वय 39 रा. महादेव गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 17.20 वा. सु. ऐश्वर्या बारचे पाठीमागे उमरगा येथे अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)छगन सोमा पवार, वय 48, वर्षे, 2)भारतबाई राजाभाउ पवार, वय 50 वर्षे, दोघे रा. वरुडा पारधी पिडी ता. जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 08.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 88,200 ₹ किंमतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)भाग्यश्री नवनाथ शिंदे, वय 45, वर्षे, 2)चिरकाड वस्ती पारा ता. वाशी, जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 15.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 12,080 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व  16 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)शिवशंकर सिदरामअप्पा व्हर्टे, वय 50, वर्षे, आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 18.40 वा. सु. चरण कमल हॉटेल बाजूस जेवळी येथे अंदाजे 3,340 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top