मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट खाते काढून बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
फेसबुकवर बनावट खाते काढून बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Osmanabad :- 

परंडा :  शिवम बिनवडे राहणार सोलापूर याने एका मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करुन त्या खात्याद्वारे त्याने यांतील प्रथम खबरी- रमेश थोरबोले यांच्या मुलीच्या नावाने मजकुर बनवून तसेच कुटूंबातील व्यक्तींचे छायाचित्रे प्रसारीत करुन रमेश यांच्या कुटूंबीयांची जुन 2022 पासुन आजपर्यत बदनामी केली. अशा मजकुराच्या रमेश थोरबोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे. 



भा.दं.सं. कलम- 469, 471, 500 सह आयटी ॲक्ट कलम- 66 (अ) अतर्गत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top