google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 येणाऱ्या काळात सर्व निवडणुका मध्ये भाजपा विजयी होईल :- नितीन काळे

येणाऱ्या काळात सर्व निवडणुका मध्ये भाजपा विजयी होईल :- नितीन काळे

0

येणाऱ्या काळात सर्व निवडणुका मध्ये भाजपा विजयी होईल :- नितीन काळे


Osmanabad :  महाराष्ट्रात जनतेला लुटणारे लुटारू सरकार सत्तेवरून गेले आहे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने शेतकरी ,युवकांना, obc ना,सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम सुरू केले आहे यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या काळात आ.राणाजगजितसिंह पाटील व माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि गल्ली ते दिल्ली असा भाजपाचा प्रवास होणार असल्याचा दुर्दम्य आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बोलून दाखवला.

ते भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या जिल्हा कार्यकारणी बैठकीत महाराष्ट्र सरकारने obc राजकीय आरक्षण, उस्मानाबादचे नांव धाराशिव तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर, शेतकरी आर्थिक मदत या विषयावर घेतलेल्या निर्णयांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रस्ताव मांडून ठरावास पाठिंबा देण्यात आला.

याबैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केलेप्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहचवा तसेच हर घर तिरंगा अभियान,बुथ सशक्तीकरण अभियानमन की बात कार्यक्रम आदी संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णीप्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, ॲड.नितीन भोसले, ॲड.खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सतिष दंडनाईक, नेताजी पाटील, प्रदिप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, विजय शिंगाडे, अजित पिंगळे, शिवाजी गीड्डे, राजकुमार पाटील, राजेंद्र पाटील, राजाभाऊ पाटील, कैलास शिंदे, संतोष बोबडे, सुरेश कवडे, महादेव वडेकर, इंद्रजित देवकते, व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top