सय्यद हिप्परगा येथे विकास कामाचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन
लोहारा : तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथे गांवांतर्गत सिमेंट रस्ता / गटार करणे - 10 लक्ष व मागासवर्गीय वस्तीत रस्ता व गटार करणे - 10 लक्ष या विकासकामांचे आज दि. ५ मार्च रोजी भूमिपूजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले केले.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, मा.तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सरपंच श्रीशैल ओवांडे, उपसरपंच गुरुनाथ यादव, चेअरमन नागनाथ पाटील, अजमेर कारभारी, अभिमान खराडे, अरुण जगताप, कास्तीचे सरपंच परवेज तांबोळी, माळेगावचे सरपंच वैभव पवार, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर, आदिनाथ भालेराव, नवनाथ भारती, सोमनाथ भोंडवे, बाबुराव यादव, शंकर भोंडवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.