कुंभेफळचे सरपंच राऊत यांच्यासह सदस्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील कुंभेफळचे सरपंच दशरथ राऊत यांच्यासह ग्राप सदस्यांचा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये दि.५ मार्च रोजी जाहीर प्रवेश केला आहे.
परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतचे सरपंच राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आप्पा नाईकवाडे, रामा आवाळे, इरफान शेख, हनुमंत नाईकवाडे, वाजीद पठाण व बबन थोरात यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे नगराध्यक्ष शुभाषसिंह सद्धीवाल जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवजल प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, आरोग्य मित्र संघटनेचे तालुका प्रमुख बालाजी नेटके, बाळासाहेब नायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.