महागाई, कांद्याचे कोसळलेले दर व गॅस पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे बोंबाबोंब
केंद्र सरकारच्या धोरणाची केली होळी
केंद्रातील मोदी व राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात बोंबाबोंब
उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) - महागाई, कांद्याचे गडगडलेले दर गॅसचे वाढविलेले दर तसेच शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्रातील मोदी व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाने यासह इतर यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करीत सरकारचा जाहीर निषेध केला.
वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळविण्याचे प्रकार, अहंकारी भाजप सरकार, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, ५० खोके एकदम ओके, सततच्या पावसामध्ये नुकसान झालेले नुकसान भरपाई न देणारे सरकार, विकास कामांना स्थगिती देणारे सरकार, शेतकरी विरोधी धोरण घेणाऱ्या सरकारमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेले आहेत, कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या केंद्रातील मोदी व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या नावानं बोंबाबोंब आंदोलन करीत सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या बोंब मारो आंदोलन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दत्ता बंडगर, युवा जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, बाळासाहेब दंडाईक, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, पंकज पाटील, राजाभाऊ पवार, सुनील बागल, नितीन शेरखाने, दीपक जाधव, मनोज केसकर, जगदीश शिंदे, सतीश लोंढे, संदीप गायकवाड, मंगेश काटे, शिवप्रसाद कोळी, साजिद शेख (छोटू), राकेश सुर्यवंशी, मुजीब शेख, महेश उपासे, सुनील वाघ, बलराज सरकाळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.