वालवड आरोग्य केंद्राचे होणार ग्रामीण रुग्णालयात रुपांतर , नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यास होणार मदत

0

वालवड आरोग्य केंद्राचे होणार ग्रामीण रुग्णालयात रुपांतर नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यास होणार मदत

 उस्मानाबाद दि.५ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील वालवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

 भूम तालुक्यातील वालवड हे मोठे गाव असून येथे जनावरांचा सर्वात मोठा बाजार व आठवडी बाजार‌ भरतो‌. विशेष म्हणजे परिसरातील गावातील नागरिकांची दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सेवेला मर्यादा येत होत्या. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत गरज निर्माण झाली होती. ही गरज लक्षात घेऊन गावकऱ्यांच्यावतीने माजी सभापती दत्ता मोहिते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती. या मागणीला मंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दि. २ मार्च रोजी विशेष बाब म्हणून शासन आदेशाने शासनाने वालवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरामुळे नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या रुग्णालयामुळे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top