पंचायत समिती निवडणूक आरक्षण निश्चितीबाबत 2 ऑगस्ट पर्यंत हरकती व सुचना करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.29(जिमाका)
उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत आठ पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची सोडत दि.२८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारुप अधिसुचना दि.२९ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व),तहसील कार्यालय (सर्व) व पंचायत समिती कार्यालय (सर्व) प्रसिध्द करण्यात आली आहे.
निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि.२९ जुलै २०२२ ते ०२ऑगस्ट २०२२ असा आहे. या कालावधीमध्ये आरक्षणाबाबत नागरिकांना हरकत आणि सूचना दाखल करावयाची असल्यास येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखा येथे दि.०२ ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल करावेत,असे आवाहन सामानय प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी केले आहे.