अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात ७ छापे , धाराशिव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध मद्य , ताडी विक्री!

0अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात ७ छापे , धाराशिव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध मद्य , ताडी विक्री!

 

धाराशिव :- अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात ७ छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे , धाराशिव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध मद्य विक्री सुरू आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील करतात मात्र कारवाई होताना दिसत नाही. शहरात अवैध मद्य विक्री व ताडी / शिंदी विक्री होत असल्याची माहिती वजा तक्रार शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच महिलांनी तक्रार दिली होती मात्र त्या ठिकाणी देखील पुन्हा अवैध मद्य विक्री व ताडी / शिंदी विक्री सुरू आहे. पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणात झोपड्या टाकून अवैध मद्य विक्री व ताडी / शिंदी विक्री सुरू आहे. तक्रार देणाऱ्यांना टार्गेट केली जात असल्यामुळे नागरिक  तक्रार देखील देत नसल्याचे माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर उस्मानाबाद न्यूज शी बोलताना नागरिकांनी दिली आहे.


जिल्ह्यात सात ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे...

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.23.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 7 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,400 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 265 लि. गावठी दारु, 750 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 52 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,65,680 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 7 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)सुनिल अंबरुषी काळे, वय 33 वर्षे, रा. गोलेगाव शिवार ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.23.12.2023 रोजी 12.30 वा. सु. गोलेगाव येथे आपल्या राहात्या पत्र्याचे शेडचे पाठीमागे जि. धाराशिव, येथे अंदाजे 35,500 ₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)छायाबाई मच्छिंद्र काळे, वय 40 वर्षे, रा. हिवरा, ता. भुम जि. धाराशिव, या दि.23.12.2023 रोजी 15.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर हिवरा येथे अंदाजे 52,600 ₹ किंमतीचे 600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 45 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.3)सुलोचना शिवाजी काळे, वय 55 वर्षे, रा. झिंगा पारधी वस्ती तेरखेडा ता. कळंब जि. धाराशिव, या दि.23.12.2023 रोजी 16.00 वा. सु.झिंगा पारधी वस्ती तेरखेडा ता. कळंब जि. धाराशिव येथे अंदाजे 44,000 ₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 120 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 4)मैनाबाई आण्णा उर्फ अनिल काळे, वय 30 वर्षे, रा. कोटाळवाडी शिवार, ता. कळंब जि. धाराशिव, या दि.23.12.2023 रोजी 15.00 वा. सु. कोठाळवाडी शिवारातील आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे  अंदाजे 85,300 ₹ किंमतीचे 920 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.5)मारुती धुळाप्पा गायकवाड, रा. काटगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव, हे दि.23.12.2023 रोजी 17.00 वा. सु.काटगाव येथे हरीदास शंकर माळी यांचे पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे 750 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)राजेंद्र तात्या शिंदे, वय 50 वर्षे, रा. पारधी पिडी ता. कळंब जि. धाराशिव, हे दि.23.12.2023 रोजी 12.45 वा. सु. कोठाळवाडी शिवारातील आपल्या राहात्या घराचे पाठीमागे अंदाजे 1,01,200 ₹ किंमतीचे 1,080 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

2) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)शिवाजी भानुदास कांबळे,  वय 42 वर्षे, रा. पेठसांगवी  ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.12.2023 रोजी 18.30 वा. सु. सास्तुर पेठ सांगवी रोडचे कडेला राजवाडा हॉटेल समोर अंदाजे 2,080 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या 52 अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.

                                               

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)