धाराशिव रोडवर अपघात, १ ठार ,१ जखमी
सोलापूर :- जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाणे हद्दीत बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ आज पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या जाणाऱ्या युवकांचा भीषण अपघात झाला. त्यात, एक जण जागीच ठार झाला असून एक जखमी आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमीर मुबारक सय्यद (वय 28, रा 422 गाडेगाव रोड) बार्शी असे मृत युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, सोहेल खान हा जखमी झाला आहे. पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे. अपघाताच्या वाढत्या घटना पाहून सोने तात्काळ उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दोन दिवस अगोदर धाराशिव शहरातील व शिंगोली येथील युवकांचा त्याच रोडवर भिषण अपघात होऊन मृत्यू झाला होता.