लहानग्या अरमिश सय्यद हिने पूर्ण केला पहिला उपवास

0

लहानग्या अरमिश सय्यद हिने पूर्ण केला पहिला उपवास

कळंब- कळंब शहरातील व्यापारी मजहरअली सय्यद यांची मुलगी अरमिश सय्यद वय वर्ष 7 हिने आपल्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला आहे. दिनांक 24 मार्च पासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. मार्च महिन्याच्या भयंकर उन्हाळ्याच्या वातावरणात वयस्कांना उपवास सहन होत नाही. अशा या उन्हात या लहान मुलीने केलेल्या उपवासमुळे तिचे कौतुक होत आहे. तिने अशा कडक उन्हाच्या वातावरणात दिवसभर काहीही न खाता पिता उपवास पूर्ण केल्याने अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र रमजान महिन्याचा पहिला उपवास घरात आनंदाने साजरा करण्यात आला. इस्लामपूर भागातील अनेक नागरिकांनी घरी जाऊन या लहानग्या मुलीला शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top