सहा वर्षाच्या लहानग्या आफीया कुरेशी ने केला पहिला उपवास.
औसा. शहरातील ज्येष्ठ पत्रकार तौफिक कुरेशी यांची मुलगी आफिया तौफ़ीक़ कुरैशी वय 6 वर्ष या मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला. मार्च महिन्याच्या या भयंकर उन्हाच्या वातावरणात ज्येष्ठांना, युवकांना उपवास सहन होत नाही.अशा या उन्हात या लहान मुलीने केलेल्या उपवासामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने केलेल्या उपवासामुळे या मुलीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र रमजान महिन्याचा पहिला उपवास घरात आनंदाने साजरा केला. संजय नगर येथील अनेक नागरिकांनी घरी जाऊन या लहानग्या मुलीला शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले.