प्रतिनिधी:
खामसवाडी जिल्हा परिषद गटात भाजपचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावा–गावातील स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच सामान्य मतदारांपर्यंत थेट संपर्क वाढवत त्यांनी व्यापक जनसंवाद अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.
राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असावे, या भूमिकेतून शंतनू पायाळ विकासाभिमुख राजकारणावर भर देत आहेत. त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४७८ तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ही केवळ सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात मतदारसंघातील तरुण वर्गासाठी कौशल्य विकास, रोजगार मेळावे, तसेच बचतगटांच्या माध्यमातून माता-भगिनींसाठी स्वयोरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब, स्वावलंबी महिला आणि रोजगारक्षम तरुण हीच खऱ्या अर्थाने विकासाची दिशा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खामसवाडी गटातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, शंतनू पायाळ यांची मोर्चेबांधणी विकासाच्या मुद्द्यावरच केंद्रित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


