वालवड, आनाळा येथे विविध विकास कामांचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

0

वालवड, आनाळा येथे विविध विकास कामांचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण


भुम : तालुक्यातील वालवड ,पोरगा तालुक्यातील आनाळा  आज विविध विकासकामांचे पालकमंत्री तथा राज्य आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण लोकार्पण  करण्यात आले. यामध्ये रस्त्यांचे लोकार्पण, पशुवैद्यकीय दवाखाना आदि विकासकामांचे लोकार्पण, व वालवड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर योजनेचा शुभारंभ  करण्यात आला.

 विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवला होता त्या विश्वासाला साजेशे अनेक कामे आपण केली आहेत असे मत आरोग्य मंत्री प्रा .डॉ तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.

मतदारसंघाचा शाश्वस्त विकास होण्यासाठी अनेक कामे करावी लागतात, योग्य क्रमाने व योग्य दर्जाची कामे व्हावीत या भूमिकेतून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा कामांचा आराखडा मी तयार केला आहे. या अनुषंगाने अनेक कामांना मंजुरी मिळाली असून त्याप्रमाणे अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पुढे देखील भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी यावेळी दिली.


यावेळी शिवसेना उस्मानाबाद जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, गौतम लटके , धनंजय सावंत, दत्ता बापू मोहिते, आण्णासाहेब जाधव, जयदेव गोफने व मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top