शेंडगे हॉस्पिटल येथे झालेल्या भ्रष्टाचाराची तपासणी आर्थिक गुन्हे अन्वेषण कडे द्या : मनसेची मागणी

0
शेंडगे हॉस्पिटल येथे झालेल्या भ्रष्टाचाराची तपासणी आर्थिक गुन्हे अन्वेषण कडे द्या : मनसेची मागणी

उस्मानाबाद :-  डॉ .आर.डी. शेंडगे यांचे हॉस्पिटलमध्ये रुग्ण व इन्शुरन्स कंपनी आणि शासनाची खुप मोठ्या प्रमाणावर फसवणूक करून करोडो रुपयाचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे . संबंधित हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांचे फिर्यादीवरून मा . जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार डॉ . आर.डी. शेडगे व संबंधित लॅब टेक्निशियन यांचे वरती उमरगा पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत . परंतु अद्याप डॉ . आर . डी . शेंडगे हे फरार असून त्यांना अटक करण्यात आलेलो नाही . 

तसेच य हॉस्पिटलच्या भ्रष्टाचारामध्ये डॉ . आर . डी . शेंडगे व्यतिरिक्त डॉ . सचिन शेंडगे ( एम.डी. ) व पंथालॉजिस्ट डॉ . अब्दुल गफार कारचे ( प्रोफेसर अँन्ड हेड , डिपार्टमेंट ऑफ पंचोलोजो , आश्विनी रुलर मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर , कुंभारी सोलापूर ) यांचा व अन्य डॉक्टरांचा समावेश असून या सर्वांनी मिळून महात्मा फुले जन आरोग्य योजना व विविध कंपन्यांचे इन्शुरन्स बोगस लाभार्थी ( रुग्ण ) दाखवून करोडो रुपयाचा अफरातफर केलेली आहे . याची सखोल चौकशी होवून संबंधितावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे . या बाबतीत स्थानिक उमरगा पोलिसांकडून तपास कामात आर्थिक हातमिळवणी करून दिरंगाई होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेशन उस्मानाबाद यांचेकडे वर्ग करून तपास करावा व झालेल्या सर्व अपहाराची रक्कम वसूल करून संबंधितावर भा.द.वि. नुसार गुन्हे दाखल करावेत .


 अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर शाहुराज लक्ष्मणराव माने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष उमरगा लोहारा यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top